विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भारतीय तिरंदाज सज्ज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भारतीय तिरंदाज सज्ज

नवी दिल्ली,  : जून दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे अंतिम पात्रता सामने,  तसेच 20-28 जून  दरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीकोमलिका बारीअंकिता भाकत आणि मधु वेदवान आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेती पूर्णिमा महातोसह नऊ सदस्यीय महिला तिरंदाजी संघ सज्ज आहेत.

भारताची सर्वात मोठी एकात्मिक उर्जा कंपनी एनटीपीसी लिमिटेडने भारतीय तिरंदाजी संघटनेबरोबर (एएआय) देशभरात तिरंदाजीचा सर्वांगीण विकास आणि जागतिक व्यासपीठावर भारतीय तिरंदाजीला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केली आहे. 

नेदरलँड्स मधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून भारताला सांघिक रौप्यपदक मिळवून देणाऱ्या तिरंदाज अतनु दासतरुणदीप राय आणि प्रवीण रमेश जाधव यांचा पुरूष रिकर्व्ह संघ विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी पॅरिसला रवाना होत आहे. एनटीपीसीचे संचालक (एचआर) दिलीप कुमार पटेल यांनी भारतीय तिरंदाजी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.भारताच्या विकासाला समर्थन देण्याव्यतिरिक्तएनटीपीसी  आपल्या समुदाय आणि समाजाच्या  समग्र विकासाला मदत करणारा आधारस्तंभ आहे. अलिकडच्या काळात भारतीय तिरंदाज दीपिकाकुमारीअतानू दासअंकिता भाकत आणि कोमलिका बारी यांनी ग्वाटेमाला येथील तिरंदाजी जागतिक स्पर्धा (टप्पा-2) दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. महिलांच्या व पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये दीपिकाकुमारी व अतानू दास यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते.