पहिल्याच स्पर्धेत लवलिनाची जबरदस्त कामगिरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पहिल्याच स्पर्धेत लवलिनाची जबरदस्त कामगिरी

टोकियो  : भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने दोन दिवसांपूर्वी कारकीर्दीतील पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची किमया साधली होती. शुक्रवारी महिलांच्या 69 किलो वजनी गटातील रोमहर्षक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लव्हलिनाने चीनच्या तैपईची माजी जगज्जेती निएन-चीनवर सरशी साधत मात केली आहे. लव्हलिनाने निएन-चीनवर 4-1 ने मात करत ऑलिम्पिकमध्ये भारताचे पदक निश्चित केल आहे.

जपान येथे सुरू असलेल्या ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनाने जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केले आहे. बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली की पदकाची खात्री होते. लव्हलिनाची उपांत्य फेरीत 2019 च्या विश्वविजेत्या टर्कीच्या ऍना लिसेन्कोशी लढत होईल.लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये 2012 साली कांस्यपदक जिंकले होते. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.