विहार तलाव ओव्हरफ्लो

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विहार तलाव ओव्हरफ्लो

मुंबई  : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज दिनांक १८ जुलै २०२१ रोजी सकाळी ९ वाजता भरुन वाहू लागला आहे. गेल्यावर्षी दिनांक ०५ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.  २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष २०१८ मध्ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.
या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.