गडचिरोली : पोलिस चकमकीत 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गडचिरोली :  पोलिस चकमकीत 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली :  गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात गुरुवारी  सकाळी सी -60 पोलिस जवान आणि नक्षलवादयामध्ये झालेल्या  चकमकीत दोन नक्षल्याना कंठस्नान घालण्यात आले. या परिसरात पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली असून मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. 

यासंदर्भात प्राप्त अधिकृत माहितीनुसार धानोरा तालुक्यातील सावरगांव पोलिस मदत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या मोरचुल जंगल परिसरात नक्षल असल्याची असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी 7 वाजेच्या सुमाराल सी-60 तुकडीच्या जवानांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. नक्षल्यांच्या या भ्याड हल्ल्याला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी सुमारे एक तास चकमक सुरू होती. जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत असल्याचे पाहून नक्षलवादी पसार झाले. या परिसरात सी-60 जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. प्राथमिक तपासणीत 2 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहे. परंतु,

चकमकीच्या ठिकाणी पोलिसांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा आढळून आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता आहे. याबाबत शोध मोहिम पूर्ण झाल्यावर नेमकी माहिती पुढे येईल असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.