चरणजित सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

चरणजित सिंग यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

चंदीगड : काँग्रेस नेते चरणजित सिंग चन्नी यांनी आज, सोमवारी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी चन्नी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
पंजाबच्या राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर चरणजित सिंग चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली. रविवारी दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड यांच्या नावांची चर्चा होती. त्यात सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते. मात्र, या सर्व नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. राज्यात अकाली दल आणि भाजपाची सत्ता असताना चरणजित सिंग चन्नी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते चमकौर साहिब मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी मंत्री म्हणून तांत्रिक शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण, रोजगार निर्मिती आणि प्रशिक्षण आणि पर्यटन आणि संस्कृती व्यवहार विभागाची जबाबदारी सांभाळली होती.



हिंदुस्थान समाचार