राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राखी व्यवसायातून महिला होताहेत आत्मनिर्भर

गोंदिया : भाऊ आला बहिणींसाठी धाऊन...!! ही म्हण आजही आपल्याला पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे चूल आणि मूल या मानसिकतेच्या पलीकडे जाऊन गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील महिला आता आत्मनिर्भरतेचे धडे आपल्या भावाचा मदतीने गिरवू लागल्या आहेत. रोशन शिवणकर या युवकाने आपल्या बहीणींना युवा नेटवर्क मैत्री मंचच्या माध्यमातून त्यांना कच्चा माल पुरवून प्रशिक्षण दिल्यानंतर या महिलांनी आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. त्या आता विक्रीसाठी उपलब्धदेखील झाल्या आहेत.
रक्षाबंधनअर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते,आपुलकी प्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण, या सणाच्या माध्यमातून गावातील आपल्या बहीणींना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प करण्याचा संकल्प युवा मैत्री ग्रूपच्या माध्यमातून रोशन शिवणकर या तरूणाने केला. महिलांच्या हाताला काही काम मिळावे म्हणून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राखी तयार करण्याचा मानस व्यक्त केला, त्यांचे मत सर्वांना पटले ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करण्याचा निर्धार केला. राखी तयार करण्याकरिता कच्चा माल शिवणकर यांनी गावातील महिलांना उपलब्ध करून दिला. अन सुरू झाला महिलांचा राख्या तयार करण्याचा व्यवसाय....!!

या राखी व्यवसायामुळे कोरोना काळात घरसंसार चालविण्यासाठी पुरूषांना महिलांची थोडा हातभार लागत असून सौंदडसारख्या गावखेड्यात तयार केलेल्या राखीला महिलांनी पसंती मिळत असून यामुळेराखीव्यवसायातून महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधून आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला. ग्रामिण भागातील महीलांना राखीपासून आपली सुरुवात केली आहे. मात्र त्या फक्त एवढ्यावरच थांबणार नसून वर्षभर साजरे होणारे सण उत्सवात उपयोगी साहित्य निर्मितीचे नियोजन मंचने केले आहे. राखी, रांगोळी, आकाशकंदील, बांगड्या निर्मिती, कापड शिलाई घर सजावटीचे इतर साहित्य निर्मितीचे काम सुरू करण्याची तयारी महिलांनी सुरू केली आहे. आत्मनिर्भर महिलांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला असून अर्थोत्पादनाबरोबरच महिलांचे कलाकौशल्य या अनुषंगाने विकसित होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
लवकरच त्यांनी तयार केलेल्या राख्यांची प्रदर्शनीदेखील भरवण्यात येणार असून विक्रीसाठी या आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध होणार आहेत. राखी व्यवसायातून महीला कशा आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधू शकतात,असे गोंदिया जिल्ह्यातील ग्रामिण भागातील महीलांनी दाखवून दिले असून यासाठी रोशनसारख्या भावाची देखील आवश्यकता असणे महत्त्वाचे आहे.