कर्णधार असावी तर अशी! पदार्पणाचा वनडे सामना खेळण्यापूर्वी मितालीने शेफाली वर्माला 'असे' दिले प्रोत्साहन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कर्णधार असावी तर अशी! पदार्पणाचा वनडे सामना खेळण्यापूर्वी मितालीने शेफाली वर्माला 'असे' दिले प्रोत्साहन

ब्रिस्टोल: इंग्लंड महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्यात सामन्यांची वनडे मालिका सुरु झाली आहे. या वनडे मालिकेचा पहिला सामना ब्रिस्टोलमधील काऊंटी ग्राऊंडवर खेळवला जात असून या सामन्यातून १७ वर्षीय शेफाली वर्माने भारतासाठी वनडे पदार्पण केले आहे.

शेफाली यापूर्वी भारताकडून कसोटी आणि टी२० सामने खेळली आहे. मात्र, तिला अजून वनडे पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. अखेर वनडे खेळण्यासाठीची तिची प्रतिक्षा संपली आहे. पहिला वनडे सामना खेळण्यापूर्वी तिला भारताची कर्णधार मिताली राजकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे. शनिवारी (२६ जून) मितालीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची २२ वर्षे पूर्ण केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी शेफालीबद्दल बोलताना मिताली म्हणाली, 'काहीवेळा ती आम्हाला चांगली सुरुवात देते. आम्हाला तिच्यातील सातत्य आवडले असते, पण त्याचवेळी हे देखील लक्षात घ्यायला हवे की ती अजून लहान आहे. हळूहळू अनुभवातून ती शिकत जाईल. ती पुढे जाऊन खेळी कशी उभारायची हे देखील शिकेल.'

तसेच पुढे मिताली म्हणाली, 'ती वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे, तेव्हा एक कर्णधार म्हणून ती जशी खेळते आणि तिला ज्याप्रकारे खेळताना मजा येते, त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. ती तिची फलंदाजीची शैली आहे.'

पुढे मितालीने शेफालीला दबाव घेता खेळण्याचाही संदेश दिला. ती म्हणाली, 'आम्ही जर लवकर विकेट्स गमावल्या तर आमच्याकडे मधल्या फळीत अनुभवी खेळाडू आहेत, जे डाव सावरु शकतात; जर आम्हाला चांगली सुरुवात मिळाली तर मधली फळी गतीने पुढे डाव नेऊ शकते. आमच्याकडे सखोल फलंदाजी आहे.' शेफालीने आत्तापर्यंत तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटी सामना आणि २२ टी२० सामने खेळले आहेत. तिने २२ टी२० सामन्यांत अर्धशतकांसह ६१७ धावा केल्या आहेत. तिने नुकतेच गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. तिने कसोटी पदार्पणाच्या दोन्ही डावात अर्धशतके ठोकत सर्वांची वाहवा मिळवली होती.