गृहनिर्माण क्षेत्र 2 वर्षांत नवी उंची गाठणार; सुधारणांचे संकेत, घरांच्या विक्रीत 30 टक्के वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गृहनिर्माण क्षेत्र 2 वर्षांत नवी उंची गाठणार; सुधारणांचे संकेत, घरांच्या विक्रीत 30 टक्के वाढ

महामारीनंतर स्वत:चे घर असण्याचे वाढलेले महत्त्व, तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध व्यावसायिक उपाययाेजनांमुळे देशातील गृहनिर्माण क्षेत्र काेविड १९ च्या प्रभावातून बाहेर पडत आहे. पुढील दाेन वर्षांत गृहनिर्माण बाजारपेठ नवी उंची गाठण्याची शक्यता आहे. एनाराॅक या मालमत्ता सल्लागार कंपनीने आपल्या संशाेधन अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे.

एनाराॅकच्या मते, २०२३ पर्यंत देशात घरांची विक्री .१७ लाखांवर जाईल आणि नवीन लाँचिंग .६२ लाखपर्यंत जाईल. याआधी २०१९ मध्ये देशातल्या गृहनिर्माण क्षेत्रात तेजी आली हाेती. त्या वेळी माेठ्या शहरांमध्ये . लाख घरांची विक्री झाली आणि .३७ लाख नवीन लाँचिंग झाले हाेते. २०२०च्या तुलनेत २०२१ हे वर्ष खूप चांगले ठरण्याची शक्यता आहे. परंतु २०१९ म्हणजे काेविडच्या आधीची पातळी गाठण्यासाठी अजून काहीसा वेळ लागेल. या वर्षी देशाच्या माेठ्या शहरांमध्ये वार्षिक आधारावर घरांच्या विक्रीत ३० टक्के वाढ हाेण्याची आशा आहे.

माॅल्समध्ये गर्दी वाढली, उत्पन्न ८०-८५ टक्क्यांवर : क्रिसिल
मुंबईत काेविडची दुसरी लाट आेसरल्यानंतर निर्बंध हटवण्यात आल्याने शाॅपिंग माॅल क्षेत्रातही वेगाने सुधारणा हाेत आहे. मालमत्ता सल्लागार क्रिसिलच्या ताज्या अहवालानुसार, या आर्थिक वर्षात मॉलचालकांना भाड्यातून मिळणारे उत्पन्न काेविडच्या आधीच्या ८०-८५ टक्क्यांवर येण्याची अपेक्षा आहे. गेल्या आर्थिक वर्षात, ते कोविडच्या आधीच्या ५५-६०% पातळीवर हाेते. वाढत्या मागणीमुळे मॉलला भेट देणाऱ्यांची संख्याही लक्षणीय वाढत आहे आणि विक्रीत भक्कम तेजी दिसत आहे. किरकोळ विक्री कोविडच्या आधीच्या ५५-६०% वर गेली आहे.