भारताची श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत २-० ने आघाडी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताची श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत २-० ने आघाडी

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने - ने आघाडी घेतली आहे. गोलंदाजीत दोन बळी घेणाऱ्या दीपक चहरच्या अष्टपैलू योगदानामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तीन गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. श्रीलंकेने गडी गमावत २७५ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. मात्र भारताने ४९. षटकांत बाद २७७ धावा करत विजयावर आपली मोहोर उमटवली.
आघाडीच्या भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे काही वेळासाठी संघ पराभवाच्या छायेत आला, अशी भीती प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. मात्र आठव्या क्रमांकावरील दीपक चहरने नाबाद ६९ धावा करत सामन्यावर आपली पकड जमवली. त्यामुळे दीपकला सामनावीर जाहीर करण्यात आले. दरम्यान, भुवनेश्वर ५४, फिरकीपटू यजुर्वेद्र चहल ५०, सूर्यकुमार यादव ५३, मनीष पांडे ३७, वानिंदू हसरंगा ३७, कृणाल पंड्या ३५ धावा काढल्या.

दीपकच्या आक्रमक फलंदाजीबाबत भारताचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमारने पत्रकार परिषदेत सांगितले की, दीपकला फलंदाजीसाठी पाठवणे हा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मास्टरस्ट्रोक होता. द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली दीपक भारतीय संघासाठी खेळला आहे. त्यामुळे त्यांना माहित होते की, दीपक उत्तम फलंदाजी करू शकतो आणि काही मोठे शॉट्स देखील खेळू शकतो.

सामन्यादरम्यान चहरच्या पायाचे स्नायू दुखावले गेले. पण तरीही त्याने मैदानावर कायम राहत भारतीय संघाला विजय मिळेपर्यंत तो विचलित झाला नाही. त्याच्या खेळीने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘विजयाचा हिरो’, ‘चमकते रहो दीपक’, असे मेसेज ट्विटरवरून करण्यात आले.