Steve Smith पुन्हा बनला नंबर-1 फलंदाज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

Steve Smith पुन्हा बनला नंबर-1 फलंदाज

आयसीसीने (ICC) नुकतंच खेळाडूंची ताजी कसोटी क्रमवारी झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) अव्वल स्थान मिळवले तर भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यापूर्वी चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. स्मिथने न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) दुसऱ्या स्थानी ढकलत पहिले स्थान काबीज केले. शिवाय, शुक्रवारी साऊथॅम्प्टन येथील हॅम्पशायर बाउल (Hampshire Bowl) येथे न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीचे 814 गुण आहेततसेच, टॉप-10 फलंदाजांमध्ये टीम इंडियाचे रिषभ पंत आणि रोहित शर्मा यांचाही समावेश आहे. पंत आणि रोहितचे प्रत्येकी 747 गुण असून दोघे संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ( गेल्या वर्षी बॉक्सिंग डे कसोटीनंतर स्मिथने पहिल्यांदा अव्वल स्थानावर दावा ठोकला. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर बसलेला किवी कर्णधार स्मिथच्या 891 गुणांच्या फक्त पाच गुणांनी पिछाडीवर आहे. अशास्थितीत जगादीक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरी करत विल्यमसन पुन्हा पहिले स्थान पटकावू शकतो. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या मागे दुसरे स्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे अश्विन पहिल्या दहा गोलंदाजांमध्ये एकमेव भारतीय आहे. दुसरीकडे, वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डर 412 रेटिंगसह कसोटी अष्टपैलू क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा रवींद्र जडेजा आणि अश्विन अनुक्रमे दुसर्या चौथ्या क्रमांकावर आहेत.