महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महिलांनाही देता येणार एनडीएची परीक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन निर्णयानंतर महिलांना देखील राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची परीक्षा देता येणार आहे. न्यायालयाने बुधवारी यासंदर्भात एक आदेश दिला आहे. त्यानुसार महिलांना ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने एनडीए आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी महिला उमेदवारांना परवानगी न देण्याच्या केंद्राच्या धोरणाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. यावेळी कोर्टाने भारतीय लष्कराला भेदभाव करणाऱ्या धोरणांमुळे फटकारत ‘सहशिक्षण’ ही समस्या का आहे, असा प्रश्न विचारला.

एनडीए परीक्षेचा निकाल याचिकेतील अंतिम निकालाच्या अधीन असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. तसेच या परीक्षेसंदर्भात एक नवीन अधिसूचना जारी करण्याचे आणि त्याला योग्य प्रसिद्धी देण्याचे आदेश कोर्टाने यूपीएससीला दिले आहेत.

तर, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी म्हटलं की लष्कराच्या प्रवेशाच्या तीन पद्धतींपैकी स्त्रियांना भारतीय मिलिटरी अकादमी (आयएमए) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीतून लष्करात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. हा निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला होता, असं भाटी म्हणाल्या. यावर “लष्कराचं धोरण लिंगभेदावर आधारित आहे”, असं खंडपीठाने म्हटलं.

याचिकाकर्त्याची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील चिन्मय प्रदिप शर्मा यांनी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापबद्दल प्रश्न केला. त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की “महिलांना या परीक्षेतून वगळणे हा पूर्णपणे धोरणात्मक निर्णय आहे आणि न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये. मुलींना एनडीएमध्ये प्रवेशास परवानगनाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या प्रगतीमध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये कोणतीही अडचण आहे.” यावर कायमस्वरूपी आयोगाच्या निर्णयानंतरही लष्कराची मानसिकता बदलत नसल्याचं म्हणत खंडपीठाने फटकारले.