भारतात कोरोना लसीकरणाने पार केला 43 कोटींचा टप्पा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात कोरोना लसीकरणाने पार केला 43 कोटींचा टप्पा

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने 43 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार एकूण 52,72,431 सत्रांमध्ये, 43,31,50,864 लसीच्या मात्रा देण्यात आल्या. गेल्या 24 तासात 51,18,210 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून रोजी सुरुवात झाली आहे. देशभरात लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
भारतात महामारीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत एकूण 3,05,43,138 तर गेल्या 24 तासात 39,972 रुग्ण कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा कल सातत्याने सकारात्मक असून आता रुग्ण बरे होण्याचा एकूण दर 97.36% झाला आहे.
भारतात गेल्या 24 तासात 39,742 नव्या रुग्णांची नोंद झाली. सलग 28 दिवस 50,000 पेक्षा कमी दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांचे हे फळ आहे. देशात सक्रीय रुग्णसंख्या 4,08,212 इतकी असून ती एकूण रुग्णसंख्येच्या 1.30% आहे.
चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात 17,18,756 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण 45.62 कोटींपेक्षा अधिक (45,62,89,567) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे चाचण्या वाढत असून दुसरीकडे साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरात घट कायम आहे. सध्या साप्ताहीक पॉझिटीव्हीटी 2.24% तर दैनंदिन पॉझिटीव्हीटी 2.31% आहे. दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर सलग 34 व्या दिवशी 3% पेक्षा कमी तर साप्ताहीक पॉझिटीव्हीटी दर सलग 48 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.