आगामी 10 जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आगामी 10 जून रोजी खंडग्रास सूर्यग्रहण

विशाखापट्टणम : यावर्षातील पहिले सूर्यग्रहण आगामी 10 जून रोजी होणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या
अमावस्येला दुपारी 1.42 ते संध्याकाळी 6.41 या कालावधीत हे खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. खंडग्रास
सूर्यग्रहणाला सूर्यग्रहणाला 'रिंग ऑफ फायर'ही म्हंटले जाते. 
जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मधोमध चंद्र येतो तेव्हा अशा प्रकारचे सूर्यग्रहण दिसते. या सूर्यग्रहणाला खंडग्रास
सूर्यग्रहणही म्हणतात. गोलाकार सूर्यग्रहण तेव्हाच होते जेव्हा चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात लांब असतो. त्यामुळे चंद्र
सूर्याच्या प्रकाशाला अवरोधित करू शकत नाही. परिणामी सूर्याचा प्रकाश चंद्राच्या चारही बाजूने एक गोलाकार
वर्तुळासारखा दिसतो. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण होते. भारतात हे
सूर्यग्रहण थोड्या प्रमाणातच पाहता येणार आहे. त्यामुळे ग्रहणाच्या वेळी पाळण्यात येणारे ग्रहणाचे नियम
भारतासाठी लागू होणार नाहीत. परिणामी भारतात सूर्यग्रहणादम्यान मंदिरेही चालू राहणार आहेत. मात्र,
अरुणाचल प्रदेश, उत्तर अमेरिका, कॅनडा, रुस या देशांमध्ये हे सूर्यग्रहण पूर्णपणे दिसणार आहे. चंद्राच्या मधोमध
येण्यामुळे काही काळासाठी आपल्याला सूर्य दिसत नाही. आणि जरी दिसला तरी तो थोड्याच स्वरुपात दिसतो.
चंद्र सूर्याचा पूर्ण किंवा थोड्या प्रमाणात प्रकाश अडवून धरतो. ज्यामुळे पृथ्वीवर अंधार परसतो.