उद्योजकांच्या विविध समस्यांचे आ. बनसोडे व महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

उद्योजकांच्या विविध समस्यांचे आ. बनसोडे व महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन

पुणे : उद्योजकांना येणाऱ्या विविध समस्यांचे आमदार अण्णा बनसोडे पिंपरी महावितरण कार्यालयाचे महावितरण कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, संचालक प्रमोद राणे, विनोद मित्तल यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील महावितरणच्या नवीन सुविधा उपलब्ध करण्यासाठी रास्ता पेठ येथील महावितरण कार्यालयाच्या मुख्य अभियंता यांच्यासोबत बैठक होणे गरजेचे असल्याचे यावेळी संदीप बेलसरे यांनी नमूद केले.जुन्या झालेल्या सुविधा, ट्रान्सफॉर्मरवर वाढलेला अतिरिक्त लोड त्यामुळे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे उद्योजकाचे होणारे नुकसान यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. अतिरिक्त झालेला लोड नवीन ट्रान्सफॉर्मर बसून विभागण्यात यावा. DPR मंजुरीसाठी हेड ऑफिसला पाठपुरावा करण्याकरिता प्रयत्न करावा. कारण DPR मधून नवीन पायाभूत सुविधा, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे शक्य होईल, उद्योजकाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल असे या निवेदनात म्हटले आहे.