अक्षय्य तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली आमराई

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अक्षय्य तृतीयेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली आमराई

सोलापूर : श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज (शुक्रवार) अक्षय तृतीया निमीत्त श्री विठ्ठलरूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी आमराईची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचा गाभारा मनमोहक दिसत आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंबा व पानांचा वापर करून सजावट करण्यात आल्याने श्री च्या गाभाऱ्यात आमराई अवतरल्याचे दिसत आहे. ही मनमोहक आरास श्री विठ्ठल भक्त विनायकशेठ काची- बुंदेले, पुणे यांनी मोफत सेवा केली आहे. याकरिता हापूस आंबा, आंब्याची पाने व इतर फळांचा रस वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिरातील श्रीं चा गाभारा व चौखांबी आमराई ने नटली आहे. सद्या कोरोनामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या आमराईची आरास व श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेत स्थळ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेता येत आहे