कोरोना लसीकरण मोहिमेत 48.93 कोटींहून अधिक मात्रांचा टप्पा पार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना लसीकरण मोहिमेत 48.93 कोटींहून अधिक मात्रांचा टप्पा पार

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतातील लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांनी 48.93 कोटींचा टप्पा ओलांडला. सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील कडेवारीनुसार, आतापर्यंत 57,21,937 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 48,93,42,295 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 37,55,115 मात्रा देण्यात आल्या.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,09,74,748 रुग्ण यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 41,726 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर 97.37% झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत, 42,982 नव्या कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली.
रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग एकोणचाळीस दिवस 50 हजारांहून कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 4,11,076 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.29 टक्के आहे. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 16,64,030 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशात 47 कोटी 48 लाखांहून अधिक (47,48,93,363 ) चाचण्या करण्यात आल्या. देशभरात एकीकडे कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.37 टक्के आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.58 टक्के आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर सलग 59 दिवस 5 टक्क्यांहून कमी राहिला आहे.