एमएस धोनीला मागे टाकत 'कर्णधार' कोहलीने केला नवा विक्रम प्रस्तापीत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एमएस धोनीला मागे टाकत 'कर्णधार' कोहलीने केला नवा विक्रम प्रस्तापीत

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात शनिवारपासून (१९ जून) जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरु झाला आहे. हा सामना शुक्रवारी सुरु होणे अपेक्षित होते, मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. शनिवारी या सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर एक मोठा विक्रम झाला आहे.

विराटचा भारताचा कर्णधार म्हणून हा ६१ वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार ठरला. त्याने हा विक्रम करताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने भारताचे ६० कसोटी सामन्यांत नेतृत्व केले होते.

एवढेच नाही तर आशिया खंडातीलही तो सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारा कर्णधार ठरला. सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या आशियाई कर्णधारांच्या यादीत विराट अव्वल क्रमांकावर तर धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराटने २०१५ सालापासून भारतीय कसोटी संघाचे नियमित कर्णधारपद सांभाळले आहे. त्याने यापूर्वी ६० सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ३६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ६० सामन्यांपैकी २७ सामन्यात विजय मिळवला होता.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने १०९ सामन्यांत नेतृत्व केले आहे. तसेच १०० हून अधिक कसोटी सामन्यांत नेतृत्व करणारा तो एकमेव कर्णधार आहे. या यादीत विराट आता धोनीला मागे टाकत व्या क्रमांकावर आला आहे. तर धोनी व्या क्रमांकावर आहे.