महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण, कोमलला रौप्य

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्राच्या तेजसला सुवर्ण, कोमलला रौप्य

जवाहरलाल नेहरू स्टेडियम, हनमकोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्राचा तेजस शिर्से आणि कोमल जगदाळे यांनी आपापल्या प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तेजसने १४.०९ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्ण पटकावले. सचिन बिहूने (१४.२२) दुसरा, तर तरुणदीप सिंग भाटियाने (१४.२३) तिसरा क्रमांक मिळवला.

महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत रेल्वेच्या पारुल चौधरीने ९:५१.०१ मिनिटांत निर्धारित अंतर गाठताना सुवर्णावर नाव कोरले. कोमलने ९:५१.०३ अशी वेळ नोंदवल्याने तिचे सुवर्णपदक थोडक्यात निसटले. रेल्वेच्या प्रीती लांबाने १०:२२.०५ वेळेसह कांस्यपदक जिंकले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीतसुद्धा पारुलने कोमलवर सरशी साधूनच सुवर्ण मिळवले होते. पारुलची ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसुद्धा ठरली.

याव्यतिरिक्त, रेल्वेच्या बी ऐश्वर्याने महिलांच्या उंच उडी प्रकारात ६.५२ मीटर इतकी झेप घेऊन यंदाच्या स्पर्धेतील विक्रमाची नोंद केली.