मिल्खा सिंग यांना करोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मिल्खा सिंग यांना करोनाची लागण

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांना करोनाची लागण झाली असून त्यांना चंडीगड येथील
निवासस्थानी विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखल्या
जाणाऱ्या ९१ वर्षीय मिल्खा यांच्यात करोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ‘‘आमच्या
काही मदतनीसांना करोनाची लागण झाल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांनी चाचणी करवून घेतली.
त्यापैकी माझा अहवाल सकारात्मक आल्याने मी चकित झालो आहे. कुटुंबातील सर्वाचा अहवाल
नकारात्मक आला आहे. येत्या तीन-चार दिवसांत मी पूर्णपणे बरा होईन, असे डॉक्टरांनी
सांगितले आहे. गुरुवारपासून मी सरावाला सुरुवात केली आहे,’’ असे मिल्खा यांनी सांगितले.