महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली!

मुंबई: करोनाची रुग्णसंख्या कमी झालेली असताना राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच राज्यात रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे. गुरुवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात १२ हजार २०७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. हा आकडा गेल्या काही दिवसांमध्ये १० हजारांच्या घरात आला होता. त्यामुळे राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५८ लाख ७६ हजार ०८७ इतकी झाली आहे. यापैकी लाख ६० हजार ६९३ ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू करून दिवस उलटले असून आज नव्या करोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढला आहे.

 

राज्यात आज एकीकडे नवे करोनाबाधित वाढले असले, तरी दुसरीकडे ११ हजार ४४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा आता ५६ लाख हजार ७५३ इतका झाला आहे. त्यामुळे अजूनही राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वरच असून तो ९५.४५ इतका नोंदवण्यात आला आहे.

राज्याचा मृत्यूदर .७७ टक्के!

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांच्या वर असताना आज राज्यात मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवारी राज्यात २६१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. आज हा आकडा वाढून ३९३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर .७७ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत राज्यात करोनामुळे लाख हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.