तमिळनाडूमध्ये 10 मे पासून दोन आठवडे संचारबंदी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तमिळनाडूमध्ये  10 मे पासून दोन आठवडे  संचारबंदी

चेन्नई : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  आयोजित   तमिळनाडू  विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात निर्माण झालेली परिस्थितीबाधितांचा आकडा आणि संसर्गाची वाढती तीव्रता आणि प्रसार लक्षात घेत नवनियुक्त  राज्य सरकारने सोमवार 10 मे पासून दोन आठवडे संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात दोन आठवडे संपूर्ण संचारबंदी असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळगमचे अधिनेता  एम के स्टालिन यांनी माध्यम प्रतिनिधींना कोरोना योध्यांचा दर्जा आणि सर्व आवश्यक सुविधा आणि लसीकरण करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.