गुजरात : मुंद्रा बंदरावर 9 हजार कोटींचे हेरॉईन जप्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गुजरात : मुंद्रा बंदरावर 9 हजार कोटींचे हेरॉईन जप्त

गांधीनगर : गुजरातमधील कच्छ भागातील मुंद्रा बंदरावर रविवारी 19 सप्टेंबर रोजी 9 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन पकडण्यात आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केली जात होती. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच कारवाई करत अंमली पदार्थांचा हा साठा बंदरावरच जप्त केलाय.

यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते. फर्मकडे यातील मालाबद्दल चौकशी केली असता, ही टेलकम पावड असल्याचे सांगितले होते. दरम्यान, गुप्तचर विभागाला शंका आल्याने त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये हेरॉईन असल्याचे समोर आले. ही निर्यात करणारी फर्म अफगाणिस्तानच्या कंधार येथे 'स्थित हसन हुसेन लिमिटेड' नावाने ओळखली जाते. डीआरआय आणि कस्टमचे ऑपरेशन गेल्या 5 दिवसांपासून सुरू होते. ही कारवाई झाल्यानंतर अधिकार्यांनी पुढील तपासणीसाठी माल पाठवल्याची माहिती आहे. तसेच, मुंद्रा बंदराव्यतिरिक्त गांधीधाम, मांडवी, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नईसह 5 इतर शहरांचा तपास करण्यात आला. या तपासात टेलकम पावडरच्या स्वरुपात करोडो किमतीची औषधे आयात केली जात असल्याची माहिती शोध यंत्रणेच्या लक्षात आली आहे.