IPLमधील दोन वेगवान गोलंदाजांनी घेतली करोना लस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

IPLमधील दोन वेगवान गोलंदाजांनी घेतली करोना लस

वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि सिद्धार्थ कौल यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर या दोघांनीही लस घेण्यासाठी लोकांना आवाहन केले. आज मी करोना लसीचा पहिला डोस घेतला. मी तुम्हा सर्वांना लवकरात लवकर लसी घेण्याचे आवाहन करतो. पोलीस, डॉक्टर आणि सर्व कर्मचार्‍यांचे आभार. मला आशा आहे, की आपण लवकरच या करोनावर मात करू”, असे दीपकने ट्विटरवर सांगितले. सिद्धार्थ कौलने ट्विटरद्वारे लस घेतल्याचे सांगितले. तो म्हणाला, ”या साथीच्या विरोधात युद्ध जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीची ढाल. आज मी पहिला डोस घेतला. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, की तुम्ही लस घ्या. आपले जीवन सामान्य व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आयपीएल २०२१मध्ये चहर आणि कौल अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघात होते. नवी दिल्ली आणि अहमदाबादमधील बायो बबलमधील करोनाची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर गेल्या आठवड्यात ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली.

दीपक चहर आणि सिद्धार्थ कौलपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने करोनाची लस टोचून घेतली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही लस घेतली. विराटने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे विराटने सांगितले. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह करोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत करोनायोद्ध्यांचे आभार मानले आहेत. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही करोनाची लस घेतल्याचे सांगितले होते.