भारतातील कोरोना रूग्णसंख्येत घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतातील कोरोना रूग्णसंख्येत घट

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली असून नव्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तसेच मृतांचा आकडा देखील एक हजाराहून कमी झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 46 हजार 148 नवीन रुग्ण आढळले. तर 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तब्बल 76 दिवसांनी मृतांची संख्या 1 हजारांच्या खाली आली आहे. भारतात यापूर्वी 12 एप्रिल रोजी 880 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नव्या रुग्णांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढले होते. देशात उपचाररत कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 72 हजार 994 इतकी आहे. आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण 1.89 टक्के आहे. रविवारी दिवसभरात कोरोनावर मात करून घरी परतेलल्यांची संख्या ही 58 हजार 576 आहे. गेल्या 46 दिवसांपासून देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रिकव्हरी रेट हा 96.80 टक्के इतका झाला आहे. तर पॉझिटिव्हिटी रेट 2.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. आठवड्याचा संसर्ग दर हा पाच टक्क्यांच्या खाली आहे. दरम्यान, सध्या देशात डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण आढळत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे