बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अवलंबण्याची वेळ आली – पंतप्रधान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अवलंबण्याची वेळ आली – पंतप्रधान

नवी दिल्ली  : जगभर तिरस्कार पसरत असताना गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा मार्ग अवलंबण्याची वेळ आली आहे. मानवतेवर विश्वास असणाऱ्यांनी एकत्र यावे आणि बुद्धांच्या शिकवणीच्या आधारे मानवजातीसाठी काम करावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बौद्ध पोर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगभरातील बौद्ध भिक्खुंशी संवाद साधला

 ते म्हणाले की, जग एका मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. अशा वेळी गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्ग अवलंबून पुढे जाणे गरजेचे आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. मागील अनेक दशकांत अशा पद्धतीची महामारी आलेली पाहिली नव्हती पुढे ते म्हणाले की, वर्षभरात कोरोनावर लस शोधणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान आहे. तसेच डॉक्टर निस्वार्थ भावनेने आपला जीव संकटात टाकून रुग्णांचे प्राण वाचवत आहेत त्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे असेही ते म्हणाले.