‘या’ पाच खेळाडूंनी केलं पदार्पण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘या’ पाच खेळाडूंनी केलं पदार्पण

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेवर गडी राखून विजय मिळवला आणि मालिकेत - अशी विजयी आघाडी घेतली. त्यानंतर आज दोन्ही संघ पुन्हा एकदा कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आमनेसामने आले आहेत. भारतासमोर निर्भेळ यशाचे तर लंकेसमोर प्रतिष्ठा राखण्याचे ध्येय आहे. आजच्या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारताकडून पाच खेळाडूंचे पदार्पण

मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात बदल अपेक्षित होता. त्यानुसार भारतीय संघात सहा बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी पाच खेळाडू वनडे पदार्पण करत आहेत. संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन साकारिया, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर यांना वनडे कॅप देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीलाही आज खेळण्याची संधी मिळाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकानेही संघात तीन बदल केले आहेत. प्रवीण जयविक्रमा, अकिला धनंजया आणि रमेश मेंडिस यांना आज खेळण्याची संधी मिळाली आहे.

वनडे क्रिकेट सुरू झाल्यापासून टीम इंडियात दुसऱ्यांदा पाच खेळाडूंनी एकावेळी पदार्पण केले आहे. १९८०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून पाच खेळाडूंनी पदार्पण केले होते. दिलीप दोशी, किर्ती आझाद, संदीप पाटील, तिरुमालाई श्रीनिवासन, रॉजर बिन्नी या पाच खेळाडूंनी पदार्पण केले होते. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवण्यात आला होता.

भारतीय संघ 

पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, नितीश राणा, हार्दिक पांड्या, कृष्णप्पा गौथम, राहुल चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्षा, चरिथ असलंका, मिनोद भानुका, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुश्मंथा चमीरा, अकिला धनंजया, प्रवीण जयविक्रम.

अशी रंगली दुसरी वनडे

कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि असालांका यांची अर्धशतके आणि तळाचा फलंदाज चमिका करुणारत्नेने ४४ धावांचे योगदान दिल्यामुळे श्रीलंकेने ५० षटकात बाद २७५ धावा केल्या. श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९३ धावांवर गडी गमावल होते. सूर्यकुमारने आपले पहिलवहिले वनडे अर्धशतक ठोकले. तो बाद झाल्यानंतर भारत पराभवाच्या छायेत सापडला होता. मात्र, भारताचा फलंदाज दीपक चहर आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमार लंकेसाठी डोकेदुखी ठरले. दीपकने झुंजार अर्धशतकी खेळी करत भुवनेश्वरसोबत ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. चिवट फलंदाजीमुळे या दोघांनी लंकेच्या तोंडचा विजयाचा घास हिरावला. नाबाद ६९ धावांची खेळी केलेल्या चहरला सामनावीर पुरस्कार मिळाला.