आध्रप्रदेशात 6 मजुरांचा संशयास्पद मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आध्रप्रदेशात 6 मजुरांचा संशयास्पद मृत्यू

गुंटूर : आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील लंकावानी डिब्बा गावात 6 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली. या 6 मजुरांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. सहाही मजूर कोळंबी प्रजनन केंद्रावर काम करणारे होते. मजुरांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकलेले नाही. पण, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.