घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विकासाचा वेग मंद झालेल्या रिअल इस्टेट सेक्टर क्षेत्रातील कामकाज अनलॉकनंतर पुन्हा जोर पकडत आहे. लॉकडाउनदरम्यान थांबलेले घरांच्या फिनिशिंगचे काम पुन्हा सुरू झाले आहे. या वर्षी घरांच्या पुरवठ्यात अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे. या वर्षी घरांच्या पुरवठ्यात २६ टक्के आणि विक्रीत ५३ टक्के वाढीची अपेक्षा आहे.

एनॉरॉक या प्रॉपर्टी कन्सल्टंटचे संचालक आणि संशोधन प्रमुख प्रशांत ठाकूर यांनीदिव्य मराठीला सांगितले की, यावेळच्या लॉकडाऊनमध्ये मागील लॉकडाऊनच्या ९०-९५ टक्क्यांच्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्रातील कामांवर ३० ते ३५ टक्केच परिणाम झाला. लॉकडाऊनमध्ये बांधकाम तर सुरू राहिले, पण फॅब्रिकेशन, प्लंबिंग, टाइल्स, फिक्सचर, इलेक्ट्रिफिकेशनसारखे स्पेशलाइज आणि फिनिशिंगचे काम बाकी होते. ऑक्सिजन, पोलाद आणि इतर कच्च्या साहित्याचा पुरवठा बाधित झाल्याने त्यात अडचणी येत होत्या. आता फिनिशिंगच्या कामालाही वेग येत आहे. यंदा घरांच्या पुरवठ्यात काही अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. या वर्षी .५० लाख घरे बांधून तयार होणार आहेत. एनारॉकच्या डेटानुसार, २०२० च्या तुलनेत पुरवठा २६ टक्के जास्त राहील तर विक्रीत ५३ टक्के वाढ होईल. वर्ष २०२० च्या लो बेसमुळे असे घडेल. वर्ष २०१९ च्या तुलनेत थोडी घसरण राहील.

नाइट फ्रंक या आणखी एका प्रॉपर्टी कन्सल्टंटनुसार, जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात रिकव्हरी होईल. पण ऑक्टोबर-डिसेंबर २०२० मध्ये जो वेग दिसला होता, तो यंदा असणार नाही. अनेक राज्यांत गेल्या वेळी स्टॅम्प ड्युटीत सूट दिल्यामुळे निवासी मालमत्तांमध्ये तेजी होती, पण या वेळी धोरणात्मक पाठिंबा नसल्याने रिकव्हरीची गती थोडी कमी राहील, असा अंदाज आहे.

या पाच कारणांमुळे रिअल इस्टेटमध्ये रिकव्हरीची अपेक्षा

  • प्रॉपर्टीच्या किमती गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी आहेत.
  • विकसक सोप्या अटी, इन्सेन्टिव्ह, इतर ऑफर देत आहेत.
  • लॉकडाऊन असल्याने लोकांजवळ इतर खर्चांतील पैसे शिल्लक.
  • वर्क फ्रॉम होममुळे मोठ्या घरांची मागणी वाढली.
  • गृह कर्जाचे व्याजदरही अजूनही खालच्या स्तरावरच.