मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा अपघात झाला आहे. बोरघाटामध्ये उतरताना एक गॅस टँकर एक्सप्रेसवर पलटी झालाय. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खोपोलीच्या हद्दीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गॅस असलेला ट्रक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. हा टँकर अशापद्धतीने पलटी झाला की मुंबईकडे येणारी संपूर्ण मार्गिका बंद झाली आहे. या टँकरमध्ये प्राँपलेन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने टँकरच्या आजूबाजूला सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

महामार्ग पोलीस, आय. आर. बी यंत्रणा, देवदूत टीम, खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई -पुणे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हा टँकर बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु होतं.