भारतात 24 तासात 2,81,386 नवे कोरोना रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतात 24 तासात  2,81,386  नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या 24 तासात भारतात 2,81,386 नवे कोरोना रुग्ण आढळले असून  4,106  नागरिकांचा मृत्य झाला आहे. 3,78,741   नागरिक बरे झाले आहेत.

भारतात कोरोनाचे 2,49,65,463  रुग्ण झाले असून एकूण  2,11,74,076  नागरिक बरे झाले आहेत. एकूण सक्रीय रुग्ण संख्या 35,16,997  झाली आहे. देशात मृतांचा आकडा 2,74,390 आहे.

आतापर्यंत देशात 18,29,26,460 नागरिकांचे लसीकरण झाले. केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण 15,73,515 नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण 31,64,23,658   चाचण्या घेण्यात आल्या.

हिंदुस्थान समाचार