सणासुदीत किरकोळ विक्री कोविडपूर्व स्थितीत येणे शक्य; जुलैमध्ये कोविडपूर्व पातळीच्या 72% वर पोहोचली

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सणासुदीत किरकोळ विक्री कोविडपूर्व स्थितीत येणे शक्य; जुलैमध्ये कोविडपूर्व पातळीच्या 72% वर पोहोचली

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेनंतर २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत देशभरात आर्थिक हालचालीत तेजी येत आहे. देशात किरकोळ विक्री आपल्या कोविडपूर्व पातळीवर म्हणजे, २०१९ च्या ७२% पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे, आता केवळ २८% चा पल्ला राहिला आहे. रिटेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या बिझनेस सर्व्हे राउंड १८ च्या निकालातून ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, वार्षिक आधारावर कोविडपूर्व पातळी म्हणजे, जून २०१९ च्या तुलनेत जून २०२१ मध्ये विक्रीने निम्मा टप्पा गाठला होता.

जुलैमध्ये सुधारणेचा वेग आणखी तेज होऊन २०१९ च्या पातळीच्या ७२ टक्क्यांवर आला आहे. पुन्हा एकदा सर्वात जास्त सुधारणा क्विक सर्व्हिस रेस्तराँमध्ये पाहायला मिळाली आहे. क्यूएसआरमध्ये कोविडपूर्व पातळीची ९७% सुधारणा झाली आहे. म्हणजे, ही जुलै २०१९ च्या पातळीपेक्षा केवळ ३% कमी राहिली. दुसरीकडे, फूड अँड ग्रोसरीमध्ये जुलै २०१९ च्या पातळीपेक्षा १२ % विक्री नोंदली.