मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून केल्या दोन मागण्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून केल्या दोन मागण्या

मुंबई : साकीनाका येथे अत्याचार झालेल्या पीडितेचा शनिवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या संदर्भात सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा, अशा आशयाचे पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी एक ट्वीट देखील केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, साकीनाका अत्याचार पीडितेचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. पोलीस सर्व आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो दखल घेतली असून सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुंबईच्या पोलीस आयुक्ताकडे करण्यात येत आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांना लागेल ती मदतही पुरवण्यात यावी, अशीही विनंती करण्यात येत आहे.