विविध संस्थांकडून नागपूरला ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर यंत्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विविध  संस्थांकडून  नागपूरला  ऑक्सीजन  कॉन्सेंट्रेटर  यंत्र

नागपूर, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  नागपुरात-विदर्भात  कोरोना संकटाची वाढती तीव्रता आणि प्रसार लक्षात घेत प्राणवायूची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींच्या विनंती आणि आवाहनानुसार आयसीआयसीआय लोम्बार्ड  संस्थेने  आपल्या  कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निधीतून 325 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर  यंत्र नागपूरला भेट दिले आहेत.

यासोबत डॉक्टर फॉर यु आणि बोईंग इंडियाने 10 लीटर प्रती  मिनिटांची क्षमता असलेले एकूण 50 ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर दिले आहेत.  नागपुर आणि  विदर्भातील  विविध भागात हे यंत्र  प्रदान करण्यात येणार  आहेत.  नितीन गडकरींच्या कार्यालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.