ICMR ने रॅपिड अँdटीजन टेस्टसाठी किटला दिली मंजुरी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ICMR ने रॅपिड अँdटीजन टेस्टसाठी किटला दिली मंजुरी

कोरोना चाचणीबाबत इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने बुधवारी मोठा
निर्णय घेतला. ICMR ने घरीच कोरोना चाचणी करण्यासाठी एका रॅपिड अँटीजन टेस्ट
किटला मंजुरी दिली आहे. या किटद्वारे लोकांना नाकातून सँपल घेऊन चाचणी करता येईल.
याच्या वापराबाबत नवीन अँडवायजरीदेखील जारी केली आहे.
मोबाइलमध्ये डाउनलोड करावे लागेल अॅप
ICMR कडून सांगितल्यानुसार, होम टेस्टिंग फक्त सिम्प्टोमॅटिक रुग्णांसाठी किंवा इतर
कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी आहे. होम टेस्टिंग किट तयार

करणाऱ्या कंपनीने सांगितले की, ही चाचणी मॅन्युअल पद्धतीने होईल. यासाठी गूगल प्ले
स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन अप डाउनलोड करावा लागेल. मोबाइल अॅपवरुन
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल.
किटचे नाव कोवीसेल्फ
होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी पुण्यातील कंपनी माय लॅब डिस्कवरी सॉल्यूशन
लिमिटेडला अधिकृत केले आहे. तसेच, या टेस्टिंग किटचे नाव COVISELF (Pathocatch)
आहे.
अशी करता येणार चाचणी
 या किटमधून नाकाचे सँपल घ्यावे लागेल.
 होम टेस्टिंग करणाऱ्याला टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यावा लागेल.
 हा फोटो ICMR च्या टेस्टिंग पोर्टलवर स्टोअर होईल.
 यानंतर तो व्यक्ती पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह असल्याची खात्री पटेल.
 पॉझिटिव्ह आल्यानंतर होम आयसोलेशनसाठी ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचे
पालन करावे लागेल.
 लक्षण असलेल्या, पण या चाचणीत निगेटीव्ह आलेल्या लोकांना RT-PCR चाचणी करावी
लागेल.