द कपिल शर्मा शो’ मध्ये झळकणार ‘लॉटरी’; रोशेल रावचं कमबॅक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

द कपिल शर्मा शो’ मध्ये झळकणार ‘लॉटरी’; रोशेल रावचं कमबॅक

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अभिनेत्री रोशेल राव धमाकेदार एन्ट्री करणार आहे. रोशेलला तिच्या लोकप्रियतेमुळे आणि प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीवरून कपिल शर्मा शो पुन्हा आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या शो मध्ये पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यासाठी रोशेल राव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वीकेंडच्या अखेरला ती शोमध्ये झळकणार असल्याचं कळतंय.

मिस इंडिया इंटरनॅशनल राहिलेल्या रोशेल राव बऱ्याच काळापासून अभिनय विश्वात सक्रिय आहेत. टेलिव्हीजन आणि चित्रपटांद्वारे ती सतत प्रेक्षकांशी जोडली गेली आहे. रोशेल राव ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अखेरला झळकली होती. स्पोर्ट्स अँकरिंग, मॉडेलिंग सोबतच ती कॉमेडी करताना देखील दिसून आली. मात्र, कपिलच्या शोच्या यंदाच्या सीजनमध्ये रोशेल पुन्हा एकदा कॉमेडीने प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे.

अभिनेत्री रोशेल रावला पुन्हा या शोमध्ये आणण्यासाठी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली होती. म्हणूनच तिला पुन्हा या सीजनमध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. ‘द कपिल शर्मा शो’मधल्या तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. रोशेलने कपिल शर्माच्या शोमध्ये नर्स ‘लॉटरी’ आणि ‘चिंगारी’ची भूमिका साकारली होती. यात ती प्रसिद्ध डॉक्टर गुलाटीची नर्स दाखवण्यात आली होती. तसंच कीकू शारदा याच्या बहिणीची देखील भूमिका तिने साकारलीय. कपिल शर्माच्या दुसऱ्या सीजनमध्ये सुद्धा ती झळकली होती.