तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट होणार ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ चित्रपट होणार ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित?

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

दिग्दर्शक आकाश खुराना आणि तापसी पन्नू ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाच्या निमित्ताने दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी रॉकेट हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी फ्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्यात ५८ कोटी रुपयांची डील झाल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटातील फर्स्ट लूकमध्ये तापसी रनिंग ट्रॅकवर पाठमोरी उभी असल्याचे पाहायला मिळाले. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारणार आहे. या भूमिकेसाठी तापसीने खूप मेहनत घेतली असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असायची. चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.