मुंबईच्या महापौरांची प्रकृती उत्तम; रुग्णालयातून सुखरूप घरी परतल्या

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईच्या महापौरांची प्रकृती उत्तम; रुग्णालयातून सुखरूप घरी परतल्या

मुंबई, : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती उत्तम असून त्या आज २० जुलै रोजी परळ येथील ग्लोबल रुग्णालयामधून सुखरूप घरी परतल्या आहे. ग्लोबल रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या निरोपाला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, ग्लोबल रुग्णालय आपल्या नावाप्रमाणे येथे आलेल्या प्रत्येक रुग्णांची या आरोग्य मंदिरात चांगली सेवा करीत असून मी सर्व रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानत असल्याचे महापौरांनी यावेळी प्रतिपादन केले.

स्थानिक . अजय चौधरी, माजी आमदार दगडू दादा सपकाळ, सुधीर साळवी यांचे विशेष सहकार्य लाभले असून याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच रुग्णालयाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. विवेक तळवलीकर, वरिष्ठ ह्दयरोग तज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी, अस्थिरोग तज्ञ डॉ. श्रीधर आर्चिक, पोटविकार तज्ञ डॉ. अमित मायदेव, यकृत तज्ञ डॉ. आकाश शुक्ला, ग्लोबल रुग्णालयाचे परिचालन प्रमुख अनुप लॉरेंस, परिचारिका विभागाच्या प्रमुख जेसिका डिसूझा या सर्वांचे सुद्धा महापौरांनी आभार मानले आहेत.

हिंदुस्थान समाचार