अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन - सुप्रिया सुळे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन - सुप्रिया सुळे

पुणे : अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात आज महापालिकेसमोर आंबिल ओढ्यातल्या रहिवासी नागरिकांनी आंदोलन केलं. या आंदोलकांना भेटायला सुप्रिया सुळे गेल्या. त्यावेळी आक्रमक होत आंदोलन करणाऱ्या नागरिकांना सुळे यांनी थेट उत्तर दिले. आज पुणे महापालिकेसमोर दोन आंदोलन झाली. एकीकडे कचरावेचक आंदोलन करत असतानाच दुसऱ्या बाजूला आंबिल ओढयातील नागरिकांनी देखील इथेच आंदोलन सुरू केलं.त्यावेळी कचरावेचकांची भेट घेऊन सुळे आंबिल ओढ्यातील नागरिकांचा भेटीला गेल्या. यावेळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी सुळे यांचा समोरच अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. आमची घरं अजित पवारांनी पाडली तुम्ही इथे का आलात असा सवाल आंदोलकांनी विचारला.या महिलांना उत्तर देताना सुळे यांनी थेट पुरावे मागितले.अजित पवारांविरोधात पुरावे दिले तर मीच तक्रार करेन असं सुळे म्हणाल्या.