इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे निधन

इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर मधल्या फळीतील सामर्थ्यशाली फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज हे वैशिष्ट्य जोपासणाऱ्या डेक्स्टर यांनी १९५८ ते १९६८ या कालावधीत ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. यांचे आजारपणामुळे वॉल्व्हरहॅम्पटन येथे निधन झाले, अशी माहिती मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) गुरुवारी दिली. ते ८६ वर्षांचे होते.

यात त्यांनी ४७.८९च्या सरासरीने एकूण ,५०२ धावा केल्या आणि ६६ बळी मिळवले. यापैकी ३० सामन्यांत डेक्स्टर यांनी देशाचे नेतृत्व केले.

दर्जेदार वेगवान माऱ्यापुढे वर्चस्व गाजवण्याची क्षमता असलेल्या डेक्स्टर यांनी नऊ शतके झळकावली. यातील सहा खेळींमध्ये १४०हून अधिक धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९५६ ते १९६८ या कालावधीत त्यांनी २१ हजारांहून अधिक धावा आणि ४१९ बळी घेतले आहेत. निवृत्तीनंतर डेक्स्टर यांनी वृत्तांकन आणि विश्लेषक म्हणून कार्य केले. तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले. वर्षाच्या पूर्वार्धातआयसीसीक्रिकेट हॉल ऑफ फ्रेममध्येही त्यांचा समावेश करण्यात आला होता.