दोन डोस घेतलेल्यांना ‘लोकल’च्या प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय”

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दोन डोस घेतलेल्यांना ‘लोकल’च्या प्रवासाबाबत दोन दिवसांत निर्णय”

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी दोन दिवसात निर्णय होऊ शकतो, असे संकेत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. याशिवाय आज मुंबईत या मुद्द्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेत सुरू केलेल्या आंदोलनाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा राजकारणाचा विषय नाही, नागरिक जसं समजून घेत आहेत, तसं राजकारण्यांनी देखील समजून घ्यावं.” असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपण जीवाची काळजी घेत आहोत, रेल्वेबद्दल दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पुढील दोन दिवसात आपल्याला कळेल की दोन डोस घेतलेल्यांना लोकांसाठी केवळ रेल्वे नाही तर इतर ठिकाणे देखील, मुभा देऊ शकतो का? काही सूट देऊ शकतो का? यावर थोडी काळजीपूर्वक चर्चा होऊन, आपल्याला कळणार आहे

 

तसेच, “अर्थात आंदोलन करावं पण मला वाटतं पण काही ठिकाणी लोकं जसं समजून घेत आहेत, तसं राजकीय पक्षांनी देखी घ्यावं. यामध्ये राजकारण नसून, मला वाटतं सोबत काम करणं गरजेचं आहे. लोकांचे जीव वाचवणं गरजेचं आहे. दोन-चार दिवसांपूर्वी केंद्राकडूनही काही नोटीस आलेल्या आहेत, काही जिल्ह्यांमध्ये धोका टळलेला नाही. मला वाटतं हे जे आपण काम करत आहोत, सगळे सोबत करत आहोत. लवकर तुम्हाला यावर काही सूट दिसेल.” असंही आदित्य ठाकरे यांनी यावेली सांगितलं आहे.