नितीन गडकरींच्या प्रयत्नातून राज्यात विविध ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून राज्यात विविध ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण

नागपूर, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता पूर्ण  करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरींनीच्या प्रयत्नातून वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेसमध्ये तयार होत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आहे. हे वितरण प्रशासकीय यंत्रणासरकारी रुग्णालये आणि इतर वितरकांच्या माध्यमातून केले जात आहे. 

रविवारी पुन्हा नव्याने पुणे डेपो येथे १२,००० तर हेट्रो फार्मानागपूर डेपो येथे ६३०६ वायलचे वितरण करण्यात आले.  राज्यातील इतर जिल्ह्यांना आत्तापर्यंत झालेल्या वितरणामध्ये अकोला - ११२७अमरावती - १८२७गोंदिया - २७७भंडारा - १९९बुलडाणा - १४७६चंद्रपूर - ३८४नांदेड - ११९२परभणी - ६६८यवतमाळ - १२९५वाशिम - १८०नागपूर - ३२०+ आजचे ६३०६हिंगोली - ३८४ यांचा समावेश आहेनितीन गडकरींच्या कार्यालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.

हिंदुस्थान समाचार