टीम इंडिया इंग्लंडला पोहोचली, राहुलने शेअर केला फोटो

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टीम इंडिया इंग्लंडला पोहोचली, राहुलने शेअर केला फोटो

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे. या दौर्यावर टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका देखील खेळायची आहे. भारतीय स्टार फलंदाज के एल राहुल ने गुरुवारी एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्याने आपण इंग्लंडला पोहोचल्याचे सांगितले.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ १८ जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल मैदानावर खेळला जाईल. यानंतर टीम इंडिया ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. राहुलने शेअर केलेल्या फोटोला, क्रिकेटप्रंमींने लाईक्स केले आहे. इंस्टाग्रामवर या फोटोला लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक्स केले आहेइंग्लंडमध्ये भारतीय संघाला आता क्वारंटाईन करण्यात येईल. यापुर्वी टीम इंडिया मुंबईत क्वारंटाईन मध्ये होती. यापूर्वी बीसीसीआयने पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा फोटो शेअर केला होता, त्यामध्ये ते सर्व विमानतळावर बसलेले दिसले. बुधवारी हे खेळाडू लंडनला रवाना झाले होते. खास गोष्ट म्हणजे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ एकाच विमानाने लंडनमध्ये पोहोचले आहेत.