मुंबईत ‘म्युकरमायकोसिस’चे ४०० रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत ‘म्युकरमायकोसिस’चे ४०० रुग्ण

मुंबई : शहरात म्युकरमायकोसिसचे सुमारे ४०० रुग्ण सध्या असून या रुग्णांना आवश्यकतेनुसार उपलब्ध ॅम्पोटेरेसिन-बी  इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी मुंबई पालिकेने केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातूनच खासगी आणि सरकारी रुग्णालयांना इंजेक्शनचे वितरण करण्यात येत आहे.

म्युकरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ॅन्टीफंगल म्हणून द्यावे लागणाऱ्या ॅम्पोटेरेसिन-बी  इंजेक्शनची मागणीही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परंतु त्या तुलनेत इंजेक्शनची उपलब्धता नसल्याने काळाबाजार होऊ नये यासाठी याच्या वितरणाची जबाबदारी पालिकेने या समितीवर सोपविली आहे.

योग्य रुग्णांना आणि समप्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी ही समिती असून यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केलेला आहे. प्रत्येक म्युकरच्या रुग्णाला लायपोझल ॅम्पोटेरेसिन-बी देण्याची आवश्यकता आहे असे नाही. तरुण वयोगटातील रुग्णांना याला पर्यायी म्हणून दिले जाणारे दुसरे ॅम्पोटेरेसिन दिले तरी चालते. पालिके ने डॅशबोर्ड तयार केला असून जसजसे रुग्णनिदान केले जातील तसतसे रुग्णांची माहिती येथे भरली जातेखासगी आणि सरकारी रुग्णालयांकडून रुग्णांसाठी मागणी केली जाते, त्यानुसार उपलब्ध साठा समप्रमाणात वितरित केला जातो. मुंबईत ४०० रुग्णांपैकी समजा १०० रुग्ण केईएममध्ये दाखल आहेत. तर उपलब्ध साठय़ाच्या २५ टक्के साठा केईएमला दिला जातो. याप्रमाणे रुग्णांनुसार साठय़ाचे वितरण केले जाते’, अशी माहिती या समितीचे प्रमुख आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.