विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत फ्रेंच ओपन उपविजेत्या त्सित्सिपासला पराभवाचा धक्का

लंडन : टेनिस जगतात सध्या विम्बल्डन स्पर्धेची रंगत पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पहिल्याच दिवशी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. तो म्हणजे यावर्षीच्या फ्रेंच ओपन स्पर्धेचा उपविजेता स्टिफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत पराभव स्विकारावा लागला आहे. त्याला अमेरिकेच्या फ्रान्सेस तियाफोने पराभवाचा धक्का दिला.

तिसऱ्या मानांकित त्सित्सिपासला तियाफोने -, -, - अशा सरळ सेटमध्ये पराभूत करत विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या लढतीत तियाफोने एकही सर्विस गमावली नाही.

सामन्यानंतर तियाफो म्हणाला, 'मला यांसारखे सामने आवडतात. मी एका स्टार खेळाडूविरुद्ध चांगले टेनिस खेळलेमला माझ्या स्वत:ला जिंकण्याची एक संधी द्यायची होती आणि मी ते केले. मी सकाळी उठलो तेव्हा, स्वत:शी हेच म्हटलं की मी आज स्टिफानोसला पराभूत करणार आणि तसंच झालं. जेव्हा कोणाचाही विश्वास नसतो, तेव्हा करुन दाखवणे मोठी गोष्ट असते.'

तियाफो आणि त्सित्सिपासमधील सामना तास मिनिटे चालला. या सामन्यातील पहिल्याच सेटमध्ये कियाफोने शानदार सुरुवात केली. त्याने - अशी आघाडी मिळवली होती. ही आघाडी टिकवून ठेवत त्याने पहिला सेट जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये दोघांमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये - अशी बरोबरी झाली होती. पण अखेर तियाफोने ब्रेक पाँइंट मिळवला आणि पुढे हा सेट जिंकत सामन्यात आघाडी मिळवली. तियाफोने तिसऱ्या सेटमध्ये त्याची लय कायम राखत सामना जिंकला. तियाफोने तिसऱ्यांदा विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

आता त्याला दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या वसेक पॉस्पिसिलचे आव्हान असेल. पॉस्पिसिलने पहिल्या फेरीत रोबेर्तो कार्लबेल बिएनला पराभूत केले आहे.