मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत उद्या केवळ महिलांचे विशेष लसीकरण

मुंबई : मुंबई : कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उद्या शुक्रवारी (17 सप्टेंबर) सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-19 लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. यामध्ये महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे. (Mumbai : special vaccinations for women only on 17th september, online pre-registration will be closed)

कोविड-19 विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र शुक्रवारी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवले जाणार आहे.

मुंबईतील सर्व 227 निर्वाचन प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, उद्या साठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.

भारतीय शास्रज्ञांनी कोरोनावर औषध शोधलं?

केंद्रीय औषध अनुसंधान केंद्र म्हणजेच ( CDRI ) सीडीआरआयसीच्या शास्रज्ञांनी कोरोनावर ( Corona ) मात करणारं औषध ( corona drug ) शोधल्याचा दावा केला आहे. हे देशातील पहिलं अँटीव्हायरल ड्रग ( Antiviral drug) असणार आहे, ज्याद्वारे कोरोना ( Covid ) उच्चाटनाचा दावा केला जात आहे. या औषधाचं नाव आहे उमिफेनोविर.( Umifenovir Drug) CDRIच्या दाव्यानुसार, आतापर्यंत 132 कोरोना रुग्णांवर याचा प्रयोग करण्यात आला, ज्यात या औषधाने कमाल केल्याचा दावा शास्रज्ञांनी केला आहे.

CDRI च्या शास्रज्ञांच्या दावानुसार हे औषध कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवरही काम करण्याची पूर्ण शक्यता आहे. कारण, डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांवर उमिफेनोवीर हे औषध काम करत असल्याचं दिसलं आहे. CDRIच्या शास्रज्ञांचा दावा आहे की, हे औषध 5 दिवसांत रुग्णाच्या शरीरातील कोरोनाला संपवतं.