मुंबईत ७३३ नवे बाधित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत ७३३ नवे बाधित

मुंबई : मुंबईत रविवारी ७३३ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर .०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बाधितांचे प्रमाण अडीच टक्के आहे.

रविवारी ७३३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या लाख २१ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ६५० रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत लाख ८८ हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. सध्या १४ हजार ८०९ उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यापैकी साडेनऊ हजार रुग्णांना लक्षणे नाहीत, तर साडेचार हजार रुग्णांना लक्षणे आहेत. ९२३ रुग्ण अद्याप गंभीर स्थितीतील आहेत.

शनिवारी २८ हजार २२६ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी .५९ टक्के नागरिक बाधित आढळले. एकूण चाचण्यांपैकी १३,६०० प्रतिजन चाचण्या होत्या, तर १४,६०० आरटीपीसीआर चाचण्या होत्या. आतापर्यंत ६८ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर .०९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्णदुपटीचा कालावधीही ७२६ दिवसांवर पोहोचला आहे.