गावकऱ्यांच्या विरोधामुळे मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

गावकऱ्यांच्या विरोधामुळे मनोज वाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले

गेल्या वर्षपासून करोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण हे थांबल्यासारखेच आहे. आता पुन्हा चित्रीकरणाला हळुहळु सुरुवात झाली आहे. अशा परिस्थीतीत बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण हे स्थानिक गावकऱ्यांनी थांबवले आहे. मनोज बाजपेयीच्या चित्रपटाचे चित्रीकरण हे उत्तराखंडमध्ये असलेल्या नैनीतालच्या सोनपाणी गावात चित्रीकरण सुरु होते.

रिपोर्टसनुसार, स्थानिक गावकऱ्यांनी गावात सुरु असलेल्या या चित्रीकरणाला विरोध केला. गावकरी म्हणाले की आता कुठे त्यांच्या भागात करोनाचा संसर्ग कमी झाला आहे. चित्रीकरण सुरू झाल्यास करोनाचा कहर पुन्हा एकदा त्यांच्या परिसरात पसरु शकतो. शुक्रवारी गावात हा सेट तयार केला जात होता, मात्र गावकऱ्यांनी निषेध केल्याने हे काम थांबविण्यात आले. गावातील लोकांचे म्हणने आहे की जेव्हा लॉकडाउन आहे, तेव्हा तिथे चित्रीकरणाची परवानगी कशी दिली जाऊ शकते. जर चित्रपटाच्या टीममधील कोणताही सदस्य करोना पॉझिटिव्ह असेल तर करोना व्हायरस पुन्हा एकदा गावात पसरु शकतो.