काही लोकांना स्वातंत्र्य काय असते हे अजूनही कळालेलं नाही- परेश रावल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काही लोकांना स्वातंत्र्य काय असते हे अजूनही कळालेलं नाही- परेश रावल

आज १५ ऑगस्ट, भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. या स्वातंत्र्य लढ्यासाठी बऱ्याच लोकांनी खूप काही केले. यामध्ये माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. बॉलिवूडमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित ‘सरदार’ नावाचा चित्रपट आला होता. यात अभिनेते परेश रावल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली होती. १९९३ साली ‘सरदार’या चित्रपटात साकारलेली त्यांची सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. तसेच परेश यांना देखील ही भूमिका खूप जवळची आहे असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान होते. त्यांचे भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यांची भूमिका साकारलेला अभिनेता परेश रावल यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कामगिरी विषयी सांगितले की, “आज आपल्या देशाची परिस्थिती पाहिल्यावर मला दररोज त्यांची आठवण येते. ते जर पंतप्रधान असते तर आज देशातील परिस्थिति वेगळी असती. अजूनही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या त्यागाला लोक समजत नाहीत किंवा त्याची कदर करत नाहीत”.