मुस्लीम असून गणेशोत्सव साजरा केल्याने अर्शी खान झाली ट्रोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुस्लीम असून गणेशोत्सव साजरा केल्याने अर्शी खान झाली ट्रोल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शोबिग बॉसमुळे अभिनेत्री अर्शी खानला प्रसिद्धी मिळाली. अर्शी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. अर्शीने गणपती बाप्पाच्या पूजेतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. आता ट्रोर्ल्सला सडेतोड उत्तर देण्यासाठी अर्शीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अर्शीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अर्शीने गुलाबी रंगाची साडी परिधान केल्याचे दिसत आहे. ‘भारतात आपण सर्व सण आनंदाने साजरे करतो. माझे हिंदू मित्र माझ्यासोबत ईद साजरी करतात आणि मी त्यांच्यासोबत गणपती आणि दिवाळी साजरी करते. मला यात काही अडचण दिसत नाही. मी गणेशोत्स साजरा करण्यासाठी माझ्या मित्र-मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथले काही फोटो मी सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर अनेकांनी मला ट्रोल केले,’ असे अर्शी म्हणाली. पुढे अर्शी म्हणाली, ‘काही लोक म्हणत आहेत की मी हे सगळं प्रसिद्धीसाठी करत आहे. तर काही म्हणतं आहेत की हा माझा सण नाही. काही लोकांनी माझ्या धर्मावरही प्रश्न विचारला आहे. अशा लोकांच्या कमेंट वाचून मला धक्का बसला. लोक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये हिंदू-मुस्लीम करत आहेत आणि जे असं काही करत आहेत त्यांनी निघून जा. मी मुस्लीम आहे आणि मला त्याचा गर्व आहे. पण त्यासोबत मी एक भारतीय आहे. त्यामुळे मी ईद पण साजरी करेन, दिवाळी पण साजरी करेन, रमजान पण साजरी करेन आणि होळी पण साजरी करेन.’ हा व्हिडीओ शेअर करतकोणताच धर्म एकमेकांशी लढायला शिकवत नाही’, असे कॅप्शन अर्शीने दिले आहे.