खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का, हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का, हायकोर्टाकडून जात प्रमाणपत्र रद्द

नवी दिल्ली,  स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले आहे. यासह खासदार राणा यांना कोर्टाने 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यानंतर आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

उच्च न्यायालयाने हा घटनेवरील घोटाळा आहे, असे मत नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच हे खोटे जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाला जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी, या निर्णयाविरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.